कोरोनाच्या भीतीमुळे राज्यसरकारने बहुजन नायक मान्यवर कांशीराम जयंती कार्यक्रमाची परवानगी नाकारली.

मुंबई १४ मार्च:


कोरोनाच्या भीतीमुळे राज्यसरकारने बहुजन नायक मान्यवर कांशीराम जयंती कार्यक्रम परवानगी नाकारली असून ३१ मार्च पर्यंत सर्व गर्दीच्या ठिकाणी जाणे व सांस्कृतिक, राजकीय सभा घेण्यास सरकार ने बंदी केली आहे.


सदर कार्यक्रम कोरपरखैरने नवी मुंबई येथे उद्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार होता परंतु ऐनवेळी कार्यक्रमाची परवानगी नाकारल्यामुळे बीएसपी कार्यकर्ते नाराज झाल्याचे बीएसपी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. संदीप ताजने यांनी दिली.