नवी मुंबईत खारघर सेक्टर -१६ मध्ये एकाच सोसायटी मध्ये पाच घरफोड्या!


खारघर/प्रतिनिधी 

खारघर सेक्टर से- १६ वास्तुविहार येथे ३ जुलै च्या मध्य रात्री एकाच ठिकाणी ५ घरफोड्या झाल्या असून लाखों रुपयांच्या सोने तसेच रोकड चोरट्यांनी लंपास करून एकच खळबळ माजून टाकली.

सदर चोरी KH -2 आणि KH -3 येथे झाली, सगळ्यात जास्त नुकसान KH -3 संस्कृती गृहनिर्माण संस्था येथे झाली असून सर्व चोऱ्या भुरट्या चोरांनी जिथे लोकं बाहेर गेलेत आहेत बरोबर असाच ठिकाणी केल्या आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की सदर चोरांनी अगोदरच रेकी करून माहिती मिळवली असावी.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व दरोडेखोर कैद झाले असून त्यांचा तपास सुरू आहे,तरी खारघर पोलिसांनी सर्व गुन्हे नोंदवून घेतले असून पुढील चौकशी सुरू असून लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.