नवी मुंबई/प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे सिवूडस विभाग अध्यक्ष ऍड. उमेश हातेकर यांनी मोफत पुस्तके वाटून साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीने यंदा नाचून नाही तर महापुरुषांचे विचार घरोघरी वाचून साजरे व्हावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिखित पुस्तके दगलबाज शिवाजी, गुलामगिरी आणि डॉ. आंबेडकर यांचे राजकीय विचार या तीन पुस्तकांचा संच मोफत घरो घरी वाचता यावा म्हणून दिनांक १२ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ पर्यंत नोंदणी करून रविवारी दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी ९५ नागरिकांना पुस्तके वाटप करत सिवूडस सेक्टर ४८ येथील चौकात तिन्ही महापुरुषांची संयुक्त जयंती दणक्यात साजरी केली. तसेच ऍड. उमेश हातेकर यांच्या नेतृत्वात सिवूडस मधील ४५ रिक्षा चालकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ऍड. सर्वजीत बनसोडे, ओ.बी.सी संघटनेचे महाराष्ट्राचे नेते प्रदिप ढोबळे, ॲड.संदेश मोरे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे माथाडी सेलचे नवीमुंबई जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, महिला जिल्हा अध्यक्ष शिल्पाताई रणदिवे, अक्षय भंडगे, स्वप्नील येवले, मिलिंद मंडपे, संजय हेगडे व भारतीय बौध्द महासभेचे सर्व पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.