खारघर /नवी मुंबई
कॉलनी फोरम विरुद्ध भाजप
पनवेल मध्ये मालमत्ता करा वरून सोशल मीडियावर पोस्ट वॉर पाहायला मिळत आहे सत्ताधारी भाजपकडून कॉलनी फोरम मालमत्ता कराच्या बाबतीत दिशाभूल करत असल्याचा आरोप होत आहे तर दुसरीकडे कॉलनी फोरम सत्ताधाऱ्यांची पोल- खोल म्हणत सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
कॉलनी फोरमच्या अध्यक्षा नगरसेविका लीना गरड यांचा मालमत्ता कर लोकसहभागातून नुकताच खारघर येथील प्रभाग समिती कार्यालयात भरण्यात आला गरड यांचे समर्थक आणि मालमत्ता कर धारक यांनी भरून उन्हात कार्यालय गाठले, जवळपास चार हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने दहा- दहा रुपये स्वतः तसेच सोसायटीचे मार्फत जमा केले.विविध संघटना व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हीमीटिंग घेतली आणि गरड यांचा मालमत्ता कर लोकसहभागातून भरण्याच्या निर्णयाला एकमताने मंजुरी देण्यात आली होती.
सध्या मालमत्ता करा वरून लीना गरड विरुद्ध सत्ताधारी भाजप असे राजकारण पाहायला मिळत आहे पनवेल महानगरपालिकेने गरड यांना मालमत्ता कर भरण्यासाठी विशेष नोटीस बजावल्यानंतर त्यांच्यासाठी कॉलनीवासी एकवटलेले पाहायला मिळाले आम्ही स्वतःचा कर न भरता लीना गरड यांचे भविष्यात मनपातील नेतृत्व कायम राहण्यासाठी त्यांचा मालमत्ताकर लोकसहभागातून करणार अशी भूमिका त्यांनी घेतली.