बीएसपी चे मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व जिल्ह्यात धरणे आंदोलन!
पनवेल/प्रतिनिधी

बीएसपी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजी यांच्या दिशा निर्देशानुसार आणि बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड.संदीपजी ताजने यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाज, मराठा समाज,मुस्लिम समाज आणि पदोन्नतीमध्ये आरक्षणासाठी समर्थन व दर दिवस पेट्रोल_डिझेल_घरगुती_गॅस च्या वाढत्या दरामुळे, वाढती महागाई मुळे, होत असलेल्या नागरिकांना त्रासासाठी महाराष्ट्र राज्य सरकार, केंद्र सरकारच्या विरोधात प्रत्येक जिल्हा कार्यालयवर निवेदन देऊन प्रदर्शन आणि आंदोलन
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी बीएसपी (बहुजन समाज पार्टी) तर्फे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात आले ह्यात पक्ष कार्यकर्ते तसेच स्थानिक लोक सुद्धा सहभागी होते.
फोटो: पनवेल, ठाणे.