नवी मुंबई / प्रतिनिधी
आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते बहुजन नायक दि.बा.पाटील साहेब यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सिडको कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले होते.महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आंदोलन अयशस्वी व्हावे ह्यासाठी सायन-पनवेल महामार्ग पूर्णपने बंद ठेवला होता तसेच भूमिपुत्र आंदोलन ठिकाणी पोचू नये म्हणुन जागोजागी नाकाबंदी केली होती तरी सुद्धा प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र रायगड-ठाणे-पालघर ह्या ठिकाणाहून नवी मुंबई सिडको भवन येथे हजारो च्या संख्येने पोचून आजचे आंदोलन जबरदस्त व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करून दाखवले आहे..
आजच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आणि शिवसेनेचे चांगलेच धाबे दणाणले दिसून आले कारण ह्या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते भूमिपुत्र म्हणून सहभागी झाले होते.भूमीपुत्रांनी दि.बा.पाटील यांच्या नावाचे आग्रह धरल्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्न उभा राहिला आहे.आंदोलनामुळे सायन-पनवेल महामार्ग तब्बल १२ तास बंद होता.