त्योक्ते चक्रीवादळामुळे प्रभावीत कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाला मदत जाहीर करा- बीएसपी ची मागणी!
कर्जत/प्रतिनिधी
योगेश गायकवाड

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा निसर्गाने नटलेला असून इकडे डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज राहत असून, इथल्या डोंगर-जंगलातील जाम, जांभूळ, आंबे, काजू अशा प्रकारची फळे विकून आपला उदरनिर्वाह करत असतो. नुकत्याच झालेल्या त्योक्ते चक्रीवादळामुळे इथल्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून डोंगर-जंगलातील साधनसंपत्ती नष्ट झाली असून अदिवासी समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून उपासमारीची वेळ आली आहे, शासनाने इथल्या आदिवासी समाजाला प्रत्येकी रु.५०००/- अशी तातडीची मदत करावी ह्यासाठी (बीएसपी) बहुजन समाज पक्षाने कर्जत तालुका नायब तहसीलदार श्री.सुधाकर राठोड यांना निवेदन दिले.ह्या वेळी बीएसपी जिल्हा अध्यक्ष सचिन भालेराव,योगेश गायकवाड उपस्थित होते.