पुणे/प्रतिनिधी
बीएसपी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड संदीप ताजने यांच्या उपस्थितीमध्ये (८ फेब्रु.) ला वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य तसेच शिरुर लोकसभा निवडणूक-२०१९
लढवून ४० हजार मतदान मिळविणारे वंचित नेते मा.राहुलजी ओव्हाळ यांनी बहुजन समाज पार्टी मध्ये प्रवेश केला.
नागपुरात ५ हजारवाले चिल्लर गेले तर खूप चर्चा झाली, आता ४० हजारवाले व तेही पुण्यातील लोकसभेचे बंदे नेते आले त्याची चर्चा जोरात व्हायलाच हवी.अशी माहिती बीएसपी कार्यालयीन सचिव महाराष्ट्र प्रदेश उत्तम शेवडे, नागपूर यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश बीएसपी चे सचिव सुदीप गायकवाड, दुसरे महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेशभाई चलवादी, पुणे जिल्हा सचिव हरीशजी डोळस, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरजजी गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, मेहबूब शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.