मुंबादेवी/प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धांगिनी माता रमाई यांच्या 123 व्या जयंती दिनी वरळी नाका येथे तेलुगू आणि कर्नाटक समाजा तर्फे मातेला अभिवादन करण्यात आले.
यावेळी माता रमाई तुम्ही आणि डॉ. बाबासाहेब होतात म्हणून आम्ही आहोत ऐसे भावपूर्ण उद्गार उपस्थितां तून आले.
कर्नाटक सेवा संघाचे सल्लागार दासरी कृष्णामूर्ती, दासरी प्रशांत, तेलंगाना फोरमचे मुलनिवासी माला, भीमत्न माला, के.चंद्रण्णा बेशता. माता रामाई स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल साळुंके आदि उपस्थित होते। या ठिकाणी /वेळी प्रबोधनकार *भंते शांतीरत्न* म्हणाले की सर्व प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांना सर्वतोपरी पाठिंबा देण्यास माता रामाईच्या मोठ्या योगदानाचा संदेश उपस्थितांना दिला.