तळा नगरपंचायत २०२१ चे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षामध्ये निवडणूक लढवण्याची स्वप्ने रंगू लागली आणि तशी तयारी देखील चालू झाली, प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीने मैदानात उतरताना दिसू लागले आहेत, त्यातच बड्या नेत्यांनी शिवसेनेतून बीजेपी आणि राष्ट्रवादीतून बिजेपीमध्ये पक्षांतर करून अचानकपणे स्फोट करून टाकला आहे.
मतदार प्रजेला काही समजेनासे झाले आहे की नेमके काय करावे असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात रेंगाळत आहेत. शिवसेना, राष्ट्रीवादी,बीजेपी, मनसे हे पक्ष निवडणूक लढणार असून बीएसपी सुद्धा निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे, नगरपंचायतच्या पहिल्या टर्ममध्ये बीएसपी हा पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.
नगरपंचायत तळा २०२१ च्या नगरपंचायत मध्ये प्रत्येक पक्ष जोर लावून काम करताना दिसत आहे.
पहिल्या टर्म मध्ये सत्तेची चावी शिवसेना पक्षाकडे गेली होती आणि विरोधी बाकावर राष्ट्रवादी आपली कमान संभाळत होते, मात्र आता सत्ता कुणाची असा पेच समोर येऊन ठेपला आहे..
प्रत्येक पक्षातील पक्ष श्रेष्ठींनी आपआपले उमेदवारांची चाचपणी करून उमेदवार हेरून ठेवले आहेत मात्र अजून कोणता उमेदवार कुठे जागा लढवणार ही माहिती गुलदस्त्यामध्ये आहे, पण आता पक्षातील नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि गुप्त उमेदवार तसेच मतदार प्रजा मतदानाची तारीख कधी जाहिर होईल याकडे चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. यावेळी सत्तेची चावी कोणाकडे जाईल याबाबत लोकांमध्ये चहाची टपरी ते मोठ्या हॉटेल पर्यंत चर्चा होताना दिसत आहे. मतदार प्रजा ज्यांना कौल देईल तो पक्ष सत्तेची चावी काबीज करील असे सर्व ठिकाणी बोलण्यात येत आहे..
त्यातच बीएसपी पक्ष निवडणूक लढवणार असून तशी बांधणी चालू आहे आहे असे बसपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष रामदास शिंदे यांनी बोलताना सांगितले..