पनवेल/प्रतिनिधी/१७ जानेवारी
भीम आर्मी कोकण विभागाची बैठक कामोठे नालंदा बुध्द विहार पनवेल येथे कोअर कमिटी प्रमुख राजू झनके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. माजी महाराष्ट्र वरीष्ठ उपाध्यक्ष रणधीरजी आल्हाट यांनी आयोजित केलेल्या या बैठकीस राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य व माजी महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे,कोअर कमिटी सदस्य जासंग बोपेगावकर,बाबा रामटेके,माजी महाराष्ट्र महासचिव अविनाशजी गायकवाड यांच्यासह कोकण विभागातील माजी कोकणप्रमुख संतोष कीर्तिकर, ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्र जाधव कर्जत तालुकाप्रमुख नम्रताताई ताम्हाणे, चेंबूर विभागातील संतोष गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले. तसेच रायगड जिल्हाप्रमुख पदावर रविंद्र साबळे, कोकण उपप्रमुख पदावर महेश कदम, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख पदावर प्रितेश पवार, लांजा तालुका अध्यक्ष पदावर नितीन कांबळे, कामोठे उपाध्यक्ष पदावर समाजसेविका लीलाताई हर्ले यांची नियुक्ती करण्यात आली,
लवकरच जिल्हा वार बैठका मेळावे घेऊन कोकण विभागाचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.20 मार्च महाड चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन भाई ऍड चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत करण्याच्या नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली.असे कोकण प्रभारी व माजी राज्य उपाध्यक्ष रणधीर आल्हाट यांनी सांगितले.