बीएसपी रायगड जिल्हा प्रभारी पदी श्री. फुलचंद किटके यांची वर्णी!
पनवेल/रायगड/प्रतिनिधी 
३० जानेवारी

नवीन पनवेल, बीएसपी भवन, येथे,संध्याकाळी ४ वाजता,बीएसपी ची जिल्हा कार्यकारिणी संघटन बैठक रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.सचिन भालेराव यांचा अध्यक्षतेखाली पार पडली,सदर बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सचिव राजपाल गावंडे,राजेश पहाडन कोकन झोन प्रभारी, प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड संजय कानडे, रायगड जिल्हा कोषाध्यक्ष गणेश उके साहेब, रायगड जिल्हा प्रभारी ऍड. अनिल नागदेवे, फुलचंद कीटके, खंडु लहाणे, नलिनीताई भाटकर, जितरत्न जाधव कर्जत, योगेश गायकवाड उपस्थित होते. 

 जिल्हा बैठकीमध्ये रायगड जिल्हा प्रभारी म्हणून फुलचंद किटके यांची नियुक्ति केली. तसेच पनवेल विधानसभा अध्यक्ष म्हणूण नलिनीताई भाटकर, पनवेल विधानसभा सचिव म्हणूण अनुसुचीत जमातितील इंजीनियर व (LL.B) जयंती नाईक यांची नियुक्ति केली. पारगाव सेक्टर अध्यक्ष म्हणूण नाथा सुर्यवंशी यांची नियुक्ति केली.