नागपूर/प्रतिनिधी
🔹बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कु मायावतीजी ह्यांचे वडील प्रभूदयाल ह्यांचे काल दिल्लीत निधन झाले. त्यांना आज नागपुरातील बसपाच्या प्रदेश कार्यालयात शोकसभा घेऊन अभिवादन करण्यात आले.
🔹बसपा चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा भाऊ गोंडाने ह्यांच्या अध्यक्षतेखाली आज शोकसभा संपन्न झाली. यावेळी मा प्रदेश सचिव उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी नितीन शिंगाडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, मा जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, मनपा पक्षनेता वैशाली नारनवरे, नगरसेवक वंदना चांदेकर, मो इब्राहिम टेलर, नरेंद्र वालदे, मंगला लांजेवार, गौतम पाटील, डॉ आनंद भालेराव, राजकुमार बोरकर, अमित सिंग, योगेश लांजेवार, अभिलेश वाहने, यशवंत पौणिकर, भारत वासनिक, ऍड आकाश खोब्रागडे, सुबोध साखरे, सदानंद जामगडे, सुरेश मानवटकर, प्रताप सूर्यवंशी, सुनील कोचे, राजेश खांडेकर, राजेंद्र सुखदेवे, बुद्धम राऊत, रफीक कुरेशी, उमेश मेश्राम, स्वप्नील ढवळे, नितीन वंजारी आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
🔹मान्यवर कांशीरामजी ह्यांनी बहन मायावतीजीना बहुजन चळवळीसाठी तयार केले व शासकसुद्धा बनविले परंतु प्रभूदयालजी ह्यांच्या मार्गदर्शनात व तालमीत बहन मायावतीजी ह्या कणखरपणे तयार झाल्या. त्यांचे निधन म्हणजे बहुजन परिवाराने अनुभवी व्यक्तीला मुकने होय अश्या प्रकारचे यावेळी अनेकांनी मत व्यक्त केले.