मुंबई/प्रतिनिधी
दि.८ सप्टेंबर
मुंबई येथील पीपल एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या एका प्राचार्याने घरी गणपती बसवला असल्याचे कळाल्याचे वृत्त समजतात मुंबईतील आंबेडकरवादी तरुणांमध्ये तीव्र नाराजी सूर उमटला.सदर प्राचार्य हा बौद्ध समाजाचा असून त्याच्या कडून असे कृत घडने हा समाजाच्या दृष्टीने खूपच खेदजनक असल्याचे आंबेडकरवादी तरुणांचे म्हणणे होते. म्हणून त्यांनी सदर माहिती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष व पीपल एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आनंदराज आंबेडकर यांना कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे.