दि.०८ सप्टेंबर २०२० वाडा :
गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने आज वाडा येथे विविध ठिकाणी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना व मजुरांना मोफत सॅनिटायजर व मास्क चे वाटप करण्यात आले. संघटनेच्या वतीने मजुरांच्या सुरक्षेची नेहमीच काळजी घेतली जाते.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष- श्री.भिमराव बागुल, सचिव- मंगेश डगले, उपाध्यक्ष- यशवंत भोईर, सहसचिव- रमेश बागुल, खजिनदार- गणपत कामडी, सदस्य- श्याम विघ्ने, गजाभाऊ भोईर, सुनिल कुमावत, गणेश भोईर, वाडा तालुका उपाध्यक्ष- सुजय जाधव व शुभम बागुल इत्यादी उपस्थित होते.