सांगली:पलूस तालुक्यातील पूरग्रस्त फेरसर्वेक्षण केलेल्या नागरिकांना तात्काळ ९५ हजार रुपयांची मदत जमा करा : रिपाई

सांगली/प्रतिनिधी


पलूस/दि.०३ पलूस तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत पडझडीचे ९५ हजार तात्काळ जमा करावेत अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या आठ दिवसात पलूस मध्ये पूरग्रस्तांना घेऊन तीव्र आंदोलन करु असा इशारा निवेदनाद्वारे पलूस तहसील कार्यालय व गटविकास अधिकारी यांना आरपीआय चे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांनी दिला.यावेळी पलूस तालुका उपाध्यक्ष शितल मोरे,रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद पलूस तालुका अध्यक्ष प्रसाद शिखरे,आरपीआय चे युवा नेते समीर धाहिंजे,अक्षय तिरमारे उपस्थित होते.


            निवेदनात लिहिले आहे मागील वर्षी पलूस तालुक्यात कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. पुरामुळे नदीजवळील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना मदत म्हणून तात्कालिक महायुती सरकारने मदत जाहीर केली होती. पडझड झालेल्या पुरग्रस्थाना ९५ हजाराची मदत शासनाने जाहीर केली होती परंतु तालुक्यातील बऱ्याच पूरग्रस्त नागरिकांना ही मदत मिळाली नाही हे वास्तव आहे. निधी शिल्लक असताना ऐक वर्ष झाले तो मिळत नाही त्यामुळे जनतेमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र संतापाची लाट आहे.मदत तात्काळ मिळावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आठ दिवसात तीव्र आंदोलन करू असा इशारा आरपीआय च्या वतीने देण्यात आला आहे.