गुना अत्याचार प्रकरण बीएसपी आक्रमक: पीडित परिवाराला न्याय द्या अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू!

मध्यप्रदेश, गुना/प्रतिनिधी


मध्यप्रदेश मधील गुना येथे दलित-आदिवासी समाजावर मध्यप्रदेश च्या शिवराज सिंह सरकार तर्फे झालेल्या अत्याचारावर बीएसपी राष्ट्रीय अध्यक्ष बहेन.मायावती यांच्या दिशनिर्देशानुसार बहुजन समाज पार्टी मध्यप्रदेशचे अध्यक्ष रमाकांत पिप्पल यांच्या नेतृत्वाखाली पीडित परिवाराला न्याय देण्यासाठी बीएसपी तर्फे राज्यपालांना निवेदन देण्यात आले असून हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपवण्यात आले आहे. बीएसपी ने पीडित परिवाराला लवकरात लवकर न्याय दयावा अशी मागणी केली असून असे नाही झाल्यास संपूर्ण मध्यप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असे बीएसपी मध्यप्रदेश चे अध्यक्ष रमाकांत पिप्पल यांनी सांगितले.