मुंबई/प्रतिनिधी
कोरोना लॉकडाउन काळात सुद्धा महाराष्ट्राच्या लाल परीने लोकांसाठी काम केले त्याचे फळ म्हणून महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाच्या ४५०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. एसटी महामंडळ आर्थिक संकटात अडकले असून हा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. तसेच नवीन भरती झालेल्या लोकांचे ट्रेनिंग सुद्धा रद्द करण्यात आलेले आहे.अगोदरच, खासगी नोकरदाऱ्यांच्या नोकरीवर कोरोनामुळे गदा आली असून आता सरकारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा ही वेळ आली आहे या निर्णयावर एस टी महामंडळाचे कर्मचारी नाराज झाले असून आता महाराष्ट्र सरकार त्यांना काय न्याय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.