भोपाळ/प्रतिनिधी
संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय आरक्षण रद्द करण्याची माागणी केली आहे.मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे आले असता त्यांनी हे विधान केले, वोट बँकेचे राजकारण आणिि सत्ता जाण्याच्याा भीतीमुळे कुठल्यायाच राजकीय पक्षात राजकीय आरक्षण रद्दद करण्याची धमक नसल्याचेे त्यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना एडवोकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की राजकीय आरक्षण हे फक्त दहा वर्षांसाठी होते, बाकी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हे तुमचे मूलभूत अधिकार असून यासाठी कुठलीही अट ठेवण्यात आली नव्हती त्यामुळे ज्यांना संविधानाची माहिती नाही त्यांनी आरक्षणाचा चुकीचा अर्थ काढून आरक्षण फक्त दहा वर्षांचे आहे असा कांगावा केला.
राजकीय आरक्षणाचा हेतू सफल झाला आहे असे आम्हास वाटत आहे तसे सर्व आंबेडकरी नेत्यांना ही वाटत आहे पण राजकीय आरक्षण रद्द करण्याची धमक भाजप तसेच काँग्रेस मध्ये नसल्याचे त्यांनी सांगितले.