लखनऊ/प्रतिनिधी
संपूर्ण देशात लोकडाऊन मुळे अडकलेल्या प्रवासी मजुरांची गंभीर परिस्थिती पाहता बसपा च्या राष्ट्रीय अध्यक्षा बहेन.मायावतींनी केंद्र व सर्व राज्य सरकार वर ताशेरे ओढत त्यांचा चांगलाच समाचार घेतला असून, त्या म्हणाल्या की केंद्र व राज्य सरकार प्रवासी मजुरांकडून रेल्वे आणि बस इत्यादी पाठविण्यासाठी भाडे आकारत आहेत हे फार दुर्दैवी आहे. सर्व राज्य सरकारांनी हे स्पष्ट केले पाहिजे की ते प्रवासी कामगारांना पाठविण्यासाठी भाडे का देत नाही?अशा परिस्थितीत बसपा चे असेही म्हणणे आहे की जर,सरकार स्थलांतरित मजुरांचे भाडे देण्यास टाळाटाळ करत असेल तर बसपा आपल्या सामर्थ्यवान लोकांच्या मदतीने त्यांच्या पाठविण्याच्या व्यवस्थेमध्ये थोडासा हातभार नक्कीच उचलेलं.