🔰 3 लाख करोड चे विना तारण ऑटोमॅटिक कर्ज मध्य आणि सूक्ष्म लघु उद्योगांसाठी मिळेल.
◼️25 ते 50 करोड बाकी असलेले सर्व उद्योग या साठी पात्र असतील
◼️याचा कालावधी 4 वर्षांचा असेल तसेच 12 महिन्याचा हफ्ते भरण्यासाठी अवधी मिळेल
◼️100% गॅरंटी सरकार द्वारे घेतली जाईल
◼️कोणती वेगळी फी किंवा तारण ची गरज नाही
◼️45 लाख उद्योगांना याचा फायदा होईल
🔰 20,000 करोड चा फंड स्ट्रेस MSME साठी
◼️सरकारने 20,000 करोड रुपयांच्या फंड ची व्यवस्था केली आहे
◼️या मधून 2 लाख उद्योगांना फायदा होईल
◼️जे उद्योग चालू आहे पण NPA आहेत असे सर्व उद्योग या साठी पात्र असतील
◼️CGTMSE ला सरकार 4000 करोड देणार
◼️CGTMSE बँक ला मदत करणार जेणे करून उद्योगांना फायदा होईल
🔰 50,000 करोड रुपयांची उद्योगांना Equity Infusion मार्फत मदत.
◼️या मधून उद्योगांसाठी 10,000 करोड ची तरतूद केली आहे
◼️या मधून equity फंड दिला जाईल
◼️या मधून उद्योगांना वाढण्यासाठी मदत होईल
◼️स्टॉक एक्सचेंज वर येण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देईल
🔰 MSME च्या नवीन व्याख्या
हे उत्पादन आणि सेवा या दोन्ही साठी लागू असेल
◼️सूक्ष्म
लागत - 1 करोड पर्यंत
टर्न ओव्हर - 5 करोड पर्यंत
◼️लघु
लागत - 10 करोड पर्यंत
टर्न ओव्हर - 50 करोड पर्यंत
◼️मध्यम
लागत - 20 करोड पर्यंत
टर्न ओव्हर - 100 करोड पर्यंत
🔰 200 करोड पर्यंत चे जागतिक टेंडर बंद
◼️या मार्फत भारतीय उद्योगांना सरकारी संस्था चे टेंडर भरता येतील
◼️या मुळे भारत आत्मनिर्भर होईल
🔰 इ मार्केट साठी प्रोत्साहन देणार
🔰 सरकार आणि त्या संबंधित सर्व पैसे हे 45 दिवसांच्या आत मिळतील
🔰 2500 करोड EPF ची मदत उद्योगांना आणि कामगारांना
◼️ पात्र संस्था ना एम्प्लॉइ आणि एम्प्लॉयर चे 12% आणि 12% EPF खात्यावर मिळतील
◼️हे मार्क , एप्रिल आणि मे 2020 च्या पगारावर मिळतील
◼️तसेच ही मदत आजून 3 महिने जून , जुलै आणि ऑगस्ट पर्यंत वाढवली जाईल
◼️या मार्फत 3.67 लाख उद्योगांना आणि 72.22 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल
🔰 EPF चे उद्योगांचे आणि कर्मचारी दोघांचे योगदान 3 महिन्या साठी कमी करणार या मध्ये 6750 करोड ची तरतूद.
◼️ या मार्फत 6.5 लाख उद्योगांना आणि 4.3 करोड कर्मचाऱ्यांना फायदा होईल
🔰 NBFC/HFCs/MFIs साठी 35,000 करोड ची तरतूद
🔰 45,000 करोड ची क्रेडिट गॅरंटी 2.0 सर्व NBFC साठी
🔰 कंत्राटदारांना 6 महिन्यांची मुदत