खारघर/प्रतिनिधी
कोरोना मुळे २ मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाउनमध्ये लागू करण्यात आले आहे. परिणामी स्थलांतरित कामगार, स्थलांतरित विद्यार्थी आणि इतर काही नागरिक अडकले आहेत. राज्य सरकारच्या एजन्सीज अर्थात महसूल, महानगरपालिका आणि पोलिस विभाग यांच्याकडून योग्य तपासणी करून या सर्वांना त्यांच्या इच्छित स्थळी परत जाण्याची परवानगी देण्यात आली असून,अशा प्रकारच्या अडकलेल्या लोकांची यादी तयार करण्यासाठी खारघर फोरम कार्यरत आहे जेणेकरून सरकार सुरळीत काम करू शकेल आणि सहकार्य करेल. तथापि, खारघर फोरमचे प्रत्येक सेक्टर मधील कार्यकर्ते माहिती गोळा करून अडकलेल्या लोकांना सुखरूप आपापल्या घरी पोहचवण्याचे काम करीत असून, खारघर फोरम चे अध्यक्ष / संस्थापक श्री. अर्जुन गरड व नगरसेविका सौ. लीना गरड यांचे खारघर वासीय अभिनंदन करीत आहेत.