नागपूर/प्रतिनिधी
बुधवार दिनांक २० मे २०२०
बसपा चे नागपूर जिल्हाध्यक्ष मा. संदीप मेश्राम यांनी बसपा कार्यकर्त्यासह नागपूर जिल्हाधिकारीच्या वतीने महाराष्ट्र राज्या चे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे ला निवेदन सोपविण्या करता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता त्यांनी बसपा जिल्हाध्यक्ष सह कार्यकर्त्यांना अर्धा तास भेटी साठी आत बोलविले नाही आणि शेवटी बाहेर जात असताना घाईगर्दीत बाहेर निवेदन घेतले असे आरोप बसपा जिल्हाध्यक्ष मा.संदीप मेश्राम नी केले.
सर्वविदित आहे कि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागा तर्फे दिनांक ५ में २०२० पासून अनुसूचित जाती -अनुसूचित जमातीतील विद्यार्थियांचे परदेशी शिक्षणातील शिष्यवृत्ती मध्ये ६ लाख उत्पनाची बेकायदेशीर क्रिमिलियर ची अट लावण्यात आलेली आहे. ही क्रिमिलियर ची अट भारतीय संविधानात दिलेल्या नियम व मार्गदर्शक तत्वांचा सरासर उल्लंघन आहे. ही अट अनुसूचित जाती आणि जमातीतिल विद्यार्थीयांचा दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर आणि अन्यायकारक हैं. म्हणून बहुजन समाज पार्टी नागपूर च्या वतीने परदेशी शिक्षणा मधील शिष्यवृत्ती ची ६ लाख उत्पन्न क्रिमिलियरची ही अन्यायकारक अट रद्द करण्याचे निवेदन महाराष्ट्रातील मा. मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे , मा.धनंजय मुंडे, मंत्री, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य, नागपूर चे पालकमंत्री मा.नितिनजी राऊत यांना सोपविण्या करता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी बसपा पदाधिकाऱ्याची दखल घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यानी त्यांना अर्धा तास बाहेर बसून ठेवले आणि शेवटी स्वतः बाहेर जात असताना घाईगर्दीत कसेतरी बाहेर निवेदन घेतले असे आरोप बसपा जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी केले. तसेच महाराष्ट्र शासनाला चेतावणी दिली कि जर अनुसूचित जाती जमातीतील परदेशी शिक्षणा मधील शिष्यवृत्ती ची ६ लाख उत्पन्न क्रिमिलियरची ही अन्यायकारक अट रद्द करण्यात आली नाही तर बसपा ह्या निर्णया विरुद्ध जनआंदोलन करेल.