मुंबई/प्रतिनिधी
ज्यावेळी बहुजन मीडियातील संपादक व पत्रकारांवर हल्ले व अन्याय होत होते त्यावेळी हेच पुरोगामी बुरखा पांघरलेले भाजप सरकार मूग गिळून बसले होते,आणि आता हेच जेव्हा मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोदी मीडियाला काही दिवसांपूर्वी सांप्रदायिक भावना भडकावल्या प्रकरणी चांगलेच फटकारले होते व संबंधीत संपादकाला जेल ची हवा खावी लागली होती. सदर न्युज चॅनेल भाजप चा असल्या कारणाने माजी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या बचावासाठी आता गोदी मीडियाच्या बाजूने उभे राहिले.त्यामुळे गोदी मीडियाची मुस्कटदाबी व अभिव्यक्तीची गळचेपी थांबवण्यासाठी माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी विनोद तावडे, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा यांनी मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.