अमदाबाद/२४ मार्च
मोदी सरकारने तयार केलेला जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' देखील कोरोना विषाणूमुळे एकटा पडला आहे. गुजरात सरकारने 25 मार्चपर्यंत येथे येणाऱ्या पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव म्हणाले की, नर्मदा जिल्हा प्रशासनाने स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे 25 मार्चपर्यंत पर्यटकांच्या येण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तथापि, गुजरातमध्ये अद्याप कोरोनाचे कोणतेही प्रकरण समोर आले नाही.
सरकारच्या या निर्णयाबद्दल सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. देशातील सर्वात मोठ्या राज्याचीउत्तर प्रदेशच्या चार वेळा.मुख्यमंत्री राहिलेल्या बहेन.मायावती यांनी उत्तर प्रदेशात बनवलेल्या रुग्णालयांशी मोदी सरकारने तयार केलेल्या पुतळ्याची तुलना नेटकरी करत आहेत. नेटकरी म्हणतात की, सरकार कसे चालवावे हे मोदींनी बहेन. मायावती यांच्या कडून शिकावे, मायावतींनी उत्तरप्रदेशात पुतळे बांधले तेव्हा भाजप-काँग्रेसने नाक मुरडली पण त्याच बहेन. मायावतींनी जेव्हा शाळा, कॉलेज, मोठ्या युनिव्हर्सिटी, मोठं-मोठे रुग्णालय बांधले तेव्हा त्यावर मीडिया सुद्धा चुप्पी साधून होती पण आज तेच रुग्णालये जनतेचा जीव वाचवत आहेत व मोदी सरकारने बनवलेला पुतळा कोरोनाच्या भीतीमुळे बंद करावा लागलाय.