थेट सरपंच निवड रद्द; अखेर विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी.

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून ताटकळत असणाऱ्या थेट सरपंच निवड रद्द करण्याच्या कायद्यावर अखेर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे.  मागील दहा दिवस राज्यपालांनी याबाबतच्या विधेयकावर स्वाक्षरीच केली नव्हती. पण, आता मात्र या विधेयकावर स्वाक्षरी झाल्यामुळे राज्यातील १९ जिल्ह्यातील दीड हजार ग्रामपंचायतील सरपंचाची निवड थेट होण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्यांमधून होणार आहे.