श्रमिक सेवा सहकारी संस्थे तर्फे खारघर येथे गरीब-मजुरांना धान्य वाटप.

खारघर (नवी मुंबई):


कोरोना विषाणू मुळे संपूर्ण जगात महामारीचे सावट दिसू लागले असून ती थांबवण्यासाठी सरकारने जनतेला घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केले असून ही परिस्थिती १४ एप्रिल पर्येंत अशीच राहणार आहे. त्यामुळे देशातील गरीब जनतेला ह्याचा सर्वात जास्त फटका पडणार असून ज्या लोकांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर भूकमारीची पाळी येत आहे.


अशातच खारघर नवी मुंबई येथे श्रमिक सेवा सहकारी संस्थेच्या वतीने अशा गरीब जनतेला अन्न-धान्य वाटप करण्यात आले असून संस्थेचे अध्यक्ष राजू अचलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही मोहीम उघडली आहे. त्यांच्या ह्या कृत्यातून माणुसकी अजून मजबूत होत आहे.