आधी कोरोना चाचणी किट तयार केले मग, बाळाला जन्म दिला..

पुण्यातील एका मराठमोळ्या महिलेने गर्भवती असतानाही अहोरात्र मेहनत घेत कोरोना चाचणीचे किट अत्यंत कमी वेळेत विकसित केले.


या किटमुळे कोरोनाची चाचणी अवघ्या 1200 रुपयांमध्ये होणार आहे.याच चाचणीला सध्या 4500 रुपयांपर्यंत खर्च येत आहे.


देशात कोरोना चाचणींच प्रमाण आता मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण कारोना चाचणींच किट्स पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकसित केले आहे.
विशेष म्हणजे या  किट्सचा श्रेय एका मराठमोळ्या महिलेला जातं. कारण ह्या महिलेने खूप कमी वेळात आणि स्वस्तात हे किट्स विकसित केले.
जगभरात अशे किड्स विकसित करण्याची परवनगी केवळ नऊ कंपन्यांना आहे. त्यामध्ये भारतातील या एकमेव कंपनी चा समावेश आहे या कंपनी कडून आता रोज दहा हजार किट्स निर्मिती करण्यात येत आहे आता यामध्ये वाढ करून पंचवीस हजार किट्स तयार करण्यात येणार आहे.


कोरोना विषाणू ची साथ महाराष्ट्रामध्ये पसरायला सुरुवात झाली तेव्हा  पुरेशा टेस्टिंग लॅब नसल्यानं अडचण मोठी झाली होती. त्यातही इंम्पोर्टेट किटमधून केलेल्या टेस्टचा रिझल्ट यायला 6 ते 7 तास लागायचे. त्यामुळे देशातील 118 लॅब्जवर जवळपास 130 कोटी जनतेचा भार होता. हीच अडचण ओळखून पिंपरी-चिंचवडच्या मायलॅबनं संशोधन सुरू केलं. तेही कोविड 19 च्या टेस्टिंग किट्स त्याचं नेतृत्व करत होत्या मीनल  डाखवे-भोसले.


कोविडसारख्या विषाणूच्या चाचण्या करणारी किट्स बनवायला एरवी 3 ते 4 महिने लागतात. पण मीनल यांनी हे किट अवघ्या सहा आठवड्यात बनवलं. ज्यावेळी मीनल किट्स बनवण्यात गुंतल्या होत्या, तेव्हा मानसिक आणि शारिरीक चॅलेंजही त्यांच्यासमोर होतं. कारण त्यांच्या पोटात एक जीव वाढत होता. पण त्याची फिकीर न करता त्या संशोधन करत राहिल्या. अखेर बाळ जन्माच्या
एक दिवस आधी कोविड 19 ची टेस्ट करणारं किट जन्माला आलं. एका अर्थानं मीनल यांनी एकावेळी दोन बाळांनाच जन्म दिला.
मीनल यांच्या किटमध्ये झालेल्या टेस्टचा रिझल्ट अवघ्या अडीच तासात येतो. परदेशातून आयात केलेलं किट टेस्टचा रिझल्ट द्यायला सहा ते सात तास लागतात. मीनल यांनी बनवलेलं किट एकाचवेळी 100 टेस्ट करण्याइतकं सक्षम आहे. मायलॅबनं तयार केलेल्या किटला आयसीएमआरनं मान्यता दिली भारतीय कंपनीनं तयार केलेलं आणि 100 टक्के अचूक रिझल्ट देणारं एकमेव किट असल्याचंही आयसीएमआरनं म्हटलं आहे.