खारघर/३० मार्च
कोरोना विषाणूमुळे महामारीचे सावट असतांना त्यावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पनवेल महानगर पालिकेच्या माध्यमातून नगरसेविका सौ.संजना समीर कदम यांच्या मागणीनुसार प्रभाग क्रं ६ मधील सेक्टर १६,१७ मधील सेलिब्रेशन के एच ४ उत्सव को ऑप हाऊसिंग सोसायटी व संस्कृती को ऑप हाऊसिंग सोसायटी मध्ये कोरोना विषाणू निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली यावेळी श्री.समीर कदम, राजू अचलकर,जयेश माने तसेच प्रत्येक सोसायटीचे अध्यक्ष व सेक्रेटरी त्या त्या सोसायटीमध्ये उपस्थित होते.