संसदेत सुद्धा लॉकडाउन,अनिश्चितकाळासाठी कामकाज तहकूब.

दिल्ली/२३ मार्च


संसदेचे कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय सत्राचा दुसरा टप्पा 3 एप्रिलपर्यंत चालणार होता, परंतु कोरोना विषाणूमुळे कार्यवाही वेळेपूर्वी तहकूब करण्यात आली. यापूर्वी खासदारांनी लोकसभेत कोरोना कमांडोसाठी टाळ्या वाजवल्या. त्याशिवाय आज लोकसभेतून वित्त विधेयक 2020 देखील मंजूर झाले.