शरद पवार 11 मार्च रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,26 मार्चच्या राज्यसभा निवडणुकीसाठी 11 मार्च रोजी उमेदवारी दाखल करतील, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी गुरुवारी दिली. पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या सदस्यांची मुदत यंदा संपुष्टात येत आहे, यामुळे निवडणुकीची गरज भासली आहे.