जातीचा दाखला रद्द; जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात.

भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं सांगत तो रद्द केला आहे. जयसिद्धेश्वर स्वामी हे सोलापूर या राखीव मतदारसंघाचे खासदार आहेत. जातीचा दाखलाच रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी आता धोक्यात येण्याची चिन्हं आहेत.