📖
_*संविधान बचाव संघर्ष समिती, भिवंडी* यांच्या वतीने *NRC/PNR/CAA विरोधात* "टावरे स्टेडियम" येथे झालेल्या "विराट मोर्चानंतर" *३१ जानेवारी २०२०* पासून दिल्ली येथील शाहीन बाग येथे चालू असणाऱ्या आंदोलनाच्या प्रेरणेने *भिवंडी, मिल्लत नगर* येथे देखील *"शाहीन बाग"* आंदोलन गेल्या १३ दिवसापासून सलगपणे चालू आहे._
_*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया* (सेक्युलर) पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस *अॅड.किरण चन्ने साहेब* यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन आज अविरतपणे चालू आहे. *अॅड.किरण चन्ने* यांची आंदोलनासाठीची व्यक्तिशः मेहनत व आंदोलनाच्या संपूर्ण बांधणीचा त्यांचा संघर्षमय प्रवास खरोखर थक्क करून टाकणारा आहे._
_प्रसंगी *"शाहीन बाग"* आंदोलनाला भेट देऊन *अॅड.किरण चन्ने साहेब* यांच्या समवेत सविस्तर चर्चा झाली. तेथील परिस्थिती व *NRC* संबंधातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोबत युवा सक्रिय आंबेडकरी कार्यकर्ते *अक्षय जी भोईर, अमोल जी, देवेंद्र जी बिरारी* आदी होते._
_________________________________
_*सुजय जाधव*_