नामदेव ढसाळ म्हणजे अविरत ऊर्जा

नामदेव ढसाळ म्हणजे अविरत ऊर्ज, धगधगता अंगार आणि सामाजिक सहवेदनेचे व्यामिश्र असे रसायन होते. साहित्य व साहित्यबाह्य जीवनात प्रखर विद्रोहाची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. ‘दलित पॅन्थर’च्या स्थापनेपासूनच सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. आपल्या लेखनातून वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या वंचित वर्गाच्या मनात त्यांनी स्फुल्लिंग चेतवले. समतेचा आणि समानतेचा लढा लढणाऱ्या नामदेव ढसाळ यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!